पृथ्वीमोलाचा माणूस ( Pruthvi Molacha Manus )
पृथ्वीमोलाचा माणूस -जनआवृत्ती
२० ऑगस्ट २०१३.... सकाळी भर रस्त्यावर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या
झाडून खून केला. अहिंसेच्या मार्गाने समाज बदलासाठी
आयुष्य झोकून देणाऱ्या विवेकवादी सामाजिक कार्यकत्यांचा
अशा प्रकारे झालेला खून संपूर्ण देशाला हलवून गेलाच पण
त्याचे पडसाद परदेशातही उमटले. हे पुस्तक म्हणजे सर्वत्र
उमटलेल्या पडसादाचे संकलन आहे.
त्यानंतर केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले.
डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात दिरंगाई, दिशाहीनता
करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना
सरकार राज्यात सत्तारूढ झाले त्यांनीही ती असंवेदनशीलता
आणि उपेक्षा कायम ठेवली धार्मिक असहिष्णुतेचा उन्माद
देशभर हळूहळू वाढत असतानाच... कोल्हापुरात
काँमेड गोविंद पानसरे, लागोलग सहा महिन्यांनी धारवाडमध्ये
डॉ. कलबुर्गी आणि पाठोपाठ गौरी लंकेश यांचा त्याच
पद्धतीने खून करण्यात आला.
या खुनांचे समर्थन करणाऱ्या व्यक्ती व गटांवर कोणताही
अंकुश न ठेवता मूकपणे खुली सूट देणारे सरकार...आणि या
छुप्या पाठिण्याचा अंदाज आल्याने वाहत असलेल्या सर्व
क्षेत्रांतील असहिष्णुतेच्या गदारोळात निषेधांचे हे पडसाद
हरवून जाऊ नयेत म्हणूनच हे पुस्तक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती कृतिशील विधायकतेतून
अहिंसकपणे या गोष्टीला विरोध करत आहे. हे पुस्तक
त्याचाच एक भाग आहे.
Weight | 250g |
---|---|
ISBN |
9788194259107 |
पुस्तकाची पाने |
160 |
बाईंडिंग |
paperback |