रीयुनियन - फ्रेड उल्मान

रीयुनियन - फ्रेड उल्मान

  • Rs. 170.00
    Unit price per 
  • Save Rs. 30
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

फ्रेड उल्मान: जर्मनीतील शटुटगार्ट येथे जन्मलेल्या फ्रेड उल्मानला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वदेश सोडावा लागला. तो चित्रकार होता, कवी होता आणि उदरनिर्वाहासाठी कायद्याचे उच्चशिक्षणही त्याने घेतले होते. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होताचं दोनच महिन्यात त्याने देश सोडला. फ्रांस, स्पेन या देशांत नशीब आजमावत तो अखेर ब्रिटनमध्ये स्थिरावला. युद्धाला तोंड फुटल्यावर शत्रू राष्ट्राचा नागरिक म्हणून ब्रिटनने त्याला सहा महिने तुरुंगवासात टाकले. पण त्यानंतरचे त्याचे आयुष्य ब्रिटनमध्ये कलावंतांच्या सहवासात गेले. चित्रकार म्हणून तो
ख्याती पावला. त्याची चित्रे ब्रिटनमधील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित केलेली आहेत. रीयुनियन हि त्याची कांदबरिका प्रसिद्ध झाल्यावर दुर्लक्षित राहिली. परंतु मध्ये ती पुनः प्रकाशित झाली तेंव्हा ऑर्थर कोस्लरच्या नजरेत आली, आणि मग यशस्वी ठरली.
युनियन
नाझी जर्मनीच्या त्या कालखंडाचा विचारही नकोसा वाटतो. त्याच कालखंडात घडते कॉन्राडिन आणि हॅन्स या दोन मित्रांच्या अधुऱ्या मैत्रीची गोष्ट. द्वेषपूर्ण राजकीय परिस्थितीतील जर्मनीमध्ये घडलेल्या आणि बिघडलेल्या या मैत्रीची कथा, बऱ्याच काळानंतर कधीतरी पुनर्भेट होऊन पूर्ण होते. एक आगळी, चटका लावणारी पुनर्भेट, फ्रेड उल्मानची ही नाजूक जिवाची कांदबरिका अनुवादित केली आहे
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी.....

पुस्तकाचे नाव
रीयुनियन 
लेखक
फ्रेड उल्मान 
अनुवादक  डॉ. मुग्धा कर्णिक

प्रकाशक

मधुश्री पब्लिकेशन 

ISBN

9788194129820

पुस्तकाची पाने

135

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend