
संविधानाच्या स्वप्नातलं गाव - डॉ. सुभाष वाघमारे
भारतीय संविधानाची काव्यात्म नाळ, स्वप्नातील गावमातीशी जुळवून देशासह विश्वाचा सांस्कृतिक नकाशा, सुख -समृद्धीने संपन्न करण्याचा ध्येयवाद कवी सुभाष वाघमारे यांनी काळजात जपलाय. येशूच्या मस्तकावरील गळणाऱ्या रक्तासह, ज्ञानेश्वरी, हरिपाठ आणि इस्लामी नमाज, बुद्धाच्या साक्षीने मानवी कल्याणाच्या अटीत कवी वाघमारे पचवू पाहताना त्यांना सर्वांचे सर्व मानवी कल्याणकारी सामर्थ्य बेरजेत हवे आहे. कारण त्यांना मानवतेचे गीत गावयाचे आहे.
डॉ.सुभाष वाघमारे यांचे वास्तवातील गावं सत्, असत् प्रवृत्तीच्या द्वंद्वाने प्रभावी आहे. म्हणूनच या कवीचा ध्यास संविधानात्मक स्वप्नांच्या रंगानी नव्या गावासह, नव्या विश्वाच्या नवसंकल्पनेत उजळून निघालाय. विषमतामुक्त आणि दुःखमुक्त मानवतेची व्यापक उदात्त भूमिका जगताना डॉ.वाघमारे यांची कविता अन्याय अत्याचारी व्यक्ती प्रवृत्तीवर शब्दांचे आसूड ओढते. सत्याची व सात्विकतेची बाजू घेते. उपरोध, उपहास ही या कवितेची शैली असून संवाद संघर्षाचा विधायक गाभा या काव्यविश्वाचे संचित आहे. वैयक्तिक व विश्वात्म प्रेम, शोषितांचा कैवार, स्त्री सन्मान, देशप्रेमासह विश्वात्मक कल्याणाची बुद्धवादी करुणा या गुण वैशिष्ट्याने हे काव्यविश्व मराठी मनात, काळजात मानवतेचा गंध पसरविणार आहे. म्हणूनच कवी वाघमारे यांचे अभिनंदन. संविधानाची नाळ थेट गावांशी जोडून विश्वकल्याणाचा ध्यास पेरणारी ही कविता मराठीत दुर्मिळ आहे.
-डॉ.श्रीपाल सबनीस
-डॉ.श्रीपाल सबनीस
प्रकाशक | संविधानाच्या स्वप्नातलं गाव / Sanvidhanachya Swapnatal Gaav |
---|---|
कवी
|
डॉ. सुभाष वाघमारे/ Dr. Subhash Waghmare |
ISBN | 9788195272211 |
पुस्तकाची पाने | 181 |
बाईंडिंग |
paperback |
We Also Recommend
Customer Reviews
Based on 1 review
Write a review