सावरकर: विस्मृतीचे पडसाद - विक्रम संपत

सावरकर: विस्मृतीचे पडसाद - विक्रम संपत

  • Rs. 600.00
    Unit price per 
  • Save Rs. 200
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

हिंदुत्व विचारसरणीचे वैचारिक स्रोत असलेले सावरकर हे निःसंशयरीत्या विसाव्या शतकातील सर्वांत वादग्रस्त ठरलेले विचारवंत आणि नेते होते.

एकीकडे उदात्तीकरण करणारी स्तुती तर दुसरीकडे त्यांना आसुरी ठरवणारी निंदा या दोन टोकांत त्यांच्या दीर्घ आणि वादळी जीवनाची कथा दोलायमान झाली आहे.

या दोन टोकांमध्ये असलेले सत्य दुर्दैवाने कधीच सामोरे आणले गेले नाही. ते आणि त्यांची विचारसरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विशेषतः महात्मा गांधींची, त्यांच्या अहिंसेची प्रबळ आणि प्रखर विरोधक म्हणून समोर येते. १८५७ चा इतिहास लिहिताना ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे’ समर्थक असलेले सावरकर अंदमानात गेल्यानंतर मुस्लिमांकडे संशयाने पाहणार्‍या हिंदुत्वा च्या संकल्पनेचे पुरस्कर्ते का झाले असावेत?

जगभरातील आणि भारताच्या अभिलेखागारांतील मूळ कागदपत्रांचे विस्तृत संशोधन करून दोन खंडात्मक चरित्र साकार झाले आहे. त्यापैकी या पहिल्या खंडात सावरकरांचा त्यांना जन्मठेपेकडे घेऊन जाणारा प्रवास ते अखेर काळ्यापाण्यातून मुक्तता होईपर्यंतचा जीवनपट मांडण्यात आला आहे. यातून सावरकर, त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी यांबद्दलचा नवीन दृष्टिकोन समोर येतो आणि त्यांच्या यशापयशावर एक नवा प्रकाश पडतो.


डॉ. विक्रम संपत
डॉ. विक्रम संपत हे बंगळुरू स्थित इतिहासकार, स्प्लेंडर्स ऑफ रॉयल म्हैसूर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ द वडीयार्स, माय नेम इज गौहर जान - द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ म्युझिशिअन अँड व्हॉइस ऑफ वीणा, एस. बालचंदर - अ बायोग्राफी या तीन प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक असून विक्रम यांना साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्याचा पहिला युवा पुरस्कार मिळाला आहे.
गौहर जान यांच्यावरील पुस्तकासाठी उत्कृष्ट ऐतिहासिक संशोधनाकरता असलेल्या न्यू यॉर्क येथील ए.आर.एस.सी. आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुस्तकावर लिलेट दुबे या ‘गौहर’ हे नाटक करत असून आशुतोष गोवारीकर हिंदी चित्रपट निर्माण करत आहेत.

 

पुस्तकाचे नाव
सावरकर: विस्मृतीचे पडसाद
/ Savarkar-Vismrutiche Padasaad 
लेखक  विक्रम संपत /  Vikram Sampat
अनुवाद रणजित सावरकर, मंजिरी मराठे / Ranjit Savarkar, Majiri Marathe

प्रकाशक

कृष्णा पब्लिकेशन

ISBN

 

पुस्तकाची पाने


बाईंडिंग

हार्ड कव्हर 


    We Also Recommend