
शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी ( Sharebajarachya Yuktichya Gosti )-स्वामीनाथन अन्नामलाई
‘शेअर बाजारात नवोदित आणि अनुभवी असलेल्यांसाठीही हे पुस्तक आहे. भारतीय शेअर बाजाराबद्दल फारशा माहीत नसलेल्या गोष्टी लेखकाने अत्यंत सोप्या, तरीही रोचक पद्धतीने सांगितलेल्या आहेत.’ - फिरोज व्ही. आर. वैश्विक सेवाप्रमुख, उपाध्यक्ष ‘एस.ए.पी.’ आणि इंडिया इन्क्ल्यूजन फाउंडेशनचे संस्थापक
हे पुस्तक तुम्ही का वाचायला हवे?
हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्हाला खालील गोष्टींबद्दल समजेल :
- शेअर बाजार जितका वेळ चालू असतो तितका वेळ संगणकासमोर बसला नाहीत, तरीही पैसे कमावता येतात.
- भरपूर नफा मिळवून देणारे शेअर्स पटकन ओळखून आपला फायदा करून घेता येतो.
- शेअर बाजारात ज्या शेअर्सचे व्यवहार आता होत नाहीत अशा अ-सूचीबद्ध शेअर्सची हाताळणी.
- भीडभाड न बाळगता ऑप्शन्स विकून टाकणे आणि नफ्याची टक्केवारी वाढवणे.
- आयपीओबद्दल आणि आयपीओकरिता पैसे कसे उभे करावेत याबद्दल माहिती.
- कागदी शेअर्सचे रूपांतरण इलेक्ट्रॉनिक शेअर्समध्ये(डिमटेरिअलायझेशन) कसे करावे.
- बीईईएस(इशएड) म्हणजे काय, तो गुंतवणुकीचा जोखीममुक्त पर्याय आहे का?
- स्टॉक स्क्रीनर्सशी ओळख.
- शेअर बाजाराला कोणत्या प्रकारच्या घोटाळ्यांमुळे फटकाबसू शकतो.
- हिंदू अविभक्त कुटुंबाची(कणऋ) स्थापना करून आयकर वाचवता येऊ शकतो.
पुस्तक | शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी / Sharebajarachya Yuktichya Goshti |
---|---|
लेखक |
स्वामीनाथन अन्नामलाई |
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
ISBN |
|
पुस्तकाची पाने |
152
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |