शिवपुत्र राजाराम ( SHIVPUTRA RAJARAM ) -  डॉ. प्रमिला जरग

शिवपुत्र राजाराम ( SHIVPUTRA RAJARAM ) - डॉ. प्रमिला जरग

  • Rs. 506.00
    Unit price per 
  • Save Rs. 89


संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा मराठा साम्राज्य प्रचंड अडचणीत आले तेव्हा  शिवाजमहाराजांचे दुसरे चिरंजीव राजाराममहाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी उचलली व मुघल साम्राज्याचे स्वराज्य काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

मराठ्यांच्या राष्ट्रजीवनातील अत्यंत कठीण अशा काळात अकरा वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांची चरितकहाणी आहे ‘शिवपुत्र राजाराम.’ मराठी सरदार आणि मुत्सद्दी यांना एकत्र आणून बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, त्यांच्या शौर्याला, आक्रमक वृत्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मराठी वीरांनी उभारलेल्या प्रखर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम महाराजांची तेजस्वी जीवनगाथा.

 

प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN

9789353174187

पुस्तकाची पाने 488
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend