शोध नेहरू-गांधी पर्वाचा -  सुरेश भटेवरा

शोध नेहरू-गांधी पर्वाचा - सुरेश भटेवरा

  • Rs. 900.00
    Unit price per 
  • Save Rs. 300
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 १५ ऑगस्ट २0२१ रोजी, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारत पदार्पण करीत आहे. देशाच्या राजकारणात नेहरू गांधी कुटुंब पाच पिढ्यांपासून केंद्रस्थानी आहे.  स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षात, भारतात काँग्रेस पक्ष जवळपास ५५ वर्षे सत्तेवर होता. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा तीन पिढ्यांनी ४0 वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा आणि राजीव गांधींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. दाराशी आलेल्या पंतप्रधान पदाचा सोनिया गांधींनी त्याग केला. राजकारणात सर्वोच्च आदर्श काय असू शकतात, याचा वस्तुपाठ नेहरू गांधी कुटुंबाच्या चार पिढ्यांनी अविरत परिश्रमातून साकार केला.  २0१४ साली काँग्रेस पक्ष लोकसभेत विरोधी बाकांवर आला. अनेक राज्यात काँग्रेसने सत्ता गमावली. राहुल आणि प्रियांकाची पाचवी पिढी या कालखंडात आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत आहे. जगाच्या पाठीवर जिथे लोकशाही अस्तित्वात आहे, त्यातला एकही देश असा नाही, जिथे एकाच कुटुंबातल्या सलग पाच पिढयांनी अनेक वर्षे जनमानसावर अधिराज्य गाजवले. मोतीलाल नेहरूंपासून, राहुल, प्रियांका पर्यंत पाच पिढ्यांनी, सन १९00 ते २0२0 अशा १२0 वर्षांच्या विस्तृत कालखंडात,  आधुनिक भारताच्या उभारणीत नेमके काय योगदान दिले, आपले आयुष्य ते कशाप्रकारे जगले, अविरत संघर्षाला ते कसे सामोरे गेले आणि जनमानसावर अनेक वर्षे त्यांनी कसे अधिराज्य गाजवले, याच्या समग्र चित्रणाचा एकत्रित लेखाजोखा सादर करणारे मराठी भाषेतले पहिलेच पुस्तक !

पुस्तकाचे नाव शोध नेहरू-गांधी पर्वाचा/ Shodh...Nehru-Gandhi Parvacha-
लेखक  सुरेश भटेवरा / Suresh Bhatewara
प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN 978-93-91547-26-4
पुस्तकाची पाने 758
बाईंडिंग

हार्डकव्हर 


We Also Recommend