
श्याम- साने गुरुजी
24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम 50 वर्षांचे लाभलेल्या साने गुरुजींनी वयाच्या पंचविशीनंतर किती विविध क्षेत्रांत काम केले, हे या महाराष्ट्राला माहीत आहे. अर्थातच, त्याची पूर्वतयारी आधीच्या पंचवीस वर्षांत झाली होती! ती कशी, हे समजून घ्यायचे असेल तर ही चार पुस्तके वाचायला हवीत... श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवनविकास या चार आत्मकथनात्मक कादंबऱ्या गुरुजींनी लिहिल्या. पहिल्या कादंबरीत त्यांचे वयाच्या 12 व्या वर्षांपर्यंतचे आयुष्य आले आहे, दुसऱ्या कादंबरीत वयाची 12 ते 16 वर्षे, तिसऱ्या कादंबरीत 16 ते 19 वर्षे आणि चौथ्या कादंबरीत 19 ते 22 वर्षे हा कालखंड आला आहे. म्हणजे 1899 ते 1921 या 22 वर्षांच्या काळातील साने गुरुजी आणि त्यांनी पाहिलेले व अनुभवलेले जग, या चार पुस्तकांत आले आहे.
Book | श्याम / Shyam |
---|---|
Author | साने गुरुजी / Sane Guruji |
Publication | Sadhana Publication |
Pages |
210 |
Binding |
Paperback |