
सिद्धार्थ पूर्वेची यात्रा ( Siddharth: Purvechi Yatra ) - नार्झीस आणि गोल्डमंड -हरमान हेसे
“अन्याय करण्यापेक्षा तो सहन करणे श्रेयस्कर. अनीतीच्या
मार्गाने एखादे ध्येय प्राप्त करून घेणे चुकीचेच, ही श्रद्धासत्ये प्राचीन
आहेत."
“जगाच्या इतिहासात राष्ट्राराष्ट्रांच्या संबंधात नवे प्रकाश-युग
येईल. ते आगामी युद्धात विजयी होणाऱ्यांनी आणलेले नसेल. हिंसेचा
वापर न करणाऱ्या, स्वतः यातना भोगणाऱ्या जिवांनीच बहुधा ते
मिळविलेले असेल."
“हिंसा हा अनाचार आहे. मूर्तिमंत दुःख, जागे आणि सावध
असतील त्यांचा अहिंसा हा एकमेव मार्ग आहे. हिंसेची वाट कधीच
सर्वांची वाट असणार नाही... राज्यकर्त्यांची नाही, तशीच इतिहास
घडवून आणणाऱ्या पुरुषांची नाही."
“आपण कोणत्या बाजूचे? हिंसेच्या की अहिंसेच्या? हे
आपल्याला ठाऊक असेल तर आपण अधिक मुक्तपणाने, समाधानाने
जगू शकू. दुःख आणि यातना स्वीकारायला आपण सदाच सिद्ध असले
पाहिजे. जुलूम आणि संहार यांसाठी कधीच नसले पाहिजे."
हरमान हेसे
पुस्तकाचे नाव | सिद्धार्थ पूर्वेची यात्रा - नार्झीस आणि गोल्डमंड /Siddharth: Purvechi Yatra, Narcissus aani Goldmund |
---|---|
लेखक | हरमान हेसे /Hermann Hesse |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
9788194589556 |
पुस्तकाची पाने | 190 |
बाईंडिंग |
हार्डकव्हर |