
स्टीफन हॉकिंग ( Kristine Larsen ) - क्रिस्तीन लारसेन
२१ वर्षांचे होत नाहीत तो पर्यंत स्टीफन हॉकिंग यांना अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस हा असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले.
या रोगामुळे त्यांच्या शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण हळूहळू संपायला सुरुवात झाली, नंतर अडख़ळत बोलणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद झाले . स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. पण झाले वेगळेच.
स्टीफन हॉकिंग हे बनले जगातील सर्वात प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ.
ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली.
हे सर्व हॉकिंग यांनी कसे साध्य केले? या पुस्तकात त्यांच्या बालपण आणि शिक्षणापासून , या जीवघेण्या आजाराची सुरुवात झाल्यापासून ते त्यांचा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होईपर्यंतच्या प्रवासाचा लेखाजोखा आहे. हॉकिंग यांचा हा संघर्ष आपल्यालाही बरेच काही शिकवून जातो.
.
प्रकाशक |
जायको पब्लिशिंग हाऊस |
---|---|
ISBN |
9788184955040 |
पुस्तकाची पाने | 200 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |