
शुअरली यू आर जोकिंग ( Surely You're Joking ) मि. फाईनमन - रिचर्ड फाईनमन
रिचर्ड फाईनमन (१९१८-१९८८)
नोबेल पुस्तकार विजेते फिजिक्स संशोधक, जे
नीतिनियम गुंडाळून वेगवेगळ्या विषयांत
साहसे करत जोमाने विस्तारत गेले. या
पुस्तकात आपल्या खास शैलीदार भाषेत ते
आपले अनुभव मांडतात. त्यात ते
'आईन्स्टाईन ' आणि 'बोहर' यांच्याशी
फिजिक्सच्या कल्पनांवर चर्चा करतात, तर
जुगार कसा खेळावा यावर 'निक द ग्रीक'
यांच्याशी कल्पनांची देवघेव करतात.
अणुबॉम्बच्या गुप्त कागदपत्रांचे संरक्षण करत
असलेल्या अति सुरक्षित तिजोऱ्या उघडतात
आणि बॅले नृत्यासाठी उत्कृष्ठ साथ करणारे
ढोलवादन करतात. बैलाशी झुंज घेणाऱ्या नग्न
स्त्रीचे चित्र काढतात. भुवया उंचावाव्यात अशी
अनेक स्वभाव-वैशिष्ट्ये या आत्मकथनातून
प्रत्ययाला येतात. थोडक्यात सांगायचे तर
फैनमान यांच्या जीवनाची सारी विक्षिप्त,
वैभवी वाटचाल म्हणजे एक प्रकांड बुद्धिमत्ता,
असीम कुतुहूल आणि अदम्य आत्मविश्वास
यांचे ज्वालाग्राही मिश्रण आहे.
प्रकाशक |
मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
9788193803646
|
पुस्तकाची पाने |
425 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |