कहाणी माहिती अधिकाराची ( Kahani Mahiti Adhikarachi ) - अरुणा रॉय । अनुवाद - अवधूत डोंगरे

  • Rs. 405.00
    Unit price per 
  • Save Rs. 45


 कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि

कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला,
याची कहाणी या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जाते.
निराळ्या शब्दांत सांगायचं तर, 'घटनात्मक नैतिकता' वाचवण्यासाठी
सरसावलेला हा मदतीचा हात आहे. अनन्यसाधारण प्रेरणादायक व्यक्तिमत्व
असलेल्या अरुण रॉय आणि त्यांचे सहकारी निखिल डे, शंकर सिंग,
त्यांची पत्नी अंशी व त्यांच्या सोबत जोडल्या गेलेल्या इतर मंडळींनी मिळून
१९९० मध्ये राजस्थानातील दुर्गम खडकाळ भागात
'मजदूर किसान शक्ती संघटन' या संस्थेची स्थापना कशी व का केली
इथपासून प्रस्तुत पुस्तकाचं 'कथानक' सुरु होतं .

अनेक बेधडक अभियानं चालवून , निग्रहाने प्रतिकार करून,
अटीतटीच्या वाटाघाटींना तोंड देऊन, कठोर निर्णय घेऊन, प्रसंगी हलाखी
व छळ सहन करून या संघटनेने असाधारण धोक्यांचा सामना केला.
आजानपणाचा अंधार दूर करणं, कायदे व हक्क यांच्याविषयीची
समजूत वाढवणं, दिवसाढवळ्या झोपा काढणाऱ्या प्रशासकांना जागं करण्यासाठी
आवश्यक असलेला निर्धार व निधडेपणा दृढ करणं,
या उद्देशाने हे प्रयत्न करण्यात आले. ही कहाणी अनपेक्षितरीत्या मिळालेल्या
समर्थनाची सुद्धा आहे. 'हल्ल्याचं लक्ष्य' असलेल्या
नोकरशाहीमधल्याच काही जागरूक घटकांकडून या चळवळीला
अनेकदा समर्थन मिळालं; शिवाय बुद्धिजीवी, लेखक, इतर बिगरसरकारी संस्था
आणि दुर्गम ठिकाणच्या प्रबुद्ध भारतीय लोकमातांकडूनही समर्थन मिळालं.
- गोपालकृष्ण गांधी (प्रस्तावनेतून) 

Book कहाणी माहिती अधिकाराची 
Author अरुणा रॉय । अनुवाद - अवधूत डोंगरे
Publication  Sadhana Publication
Language  Marathi
Category
Weight

 

Pages

406

Binding

 Paperback


We Also Recommend