थिंक लाइक अ मंक ( Think Like a Monk ) - संन्याश्यासारखा विचार करा - जय शेट्टी

थिंक लाइक अ मंक ( Think Like a Monk ) - संन्याश्यासारखा विचार करा - जय शेट्टी

  • Rs. 369.00
    Unit price per 
  • Save Rs. 30
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

थिंक लाइक अ मंक हे पुस्तक नकारात्मक विचारांवर आणि सवयींवर कशी मात करावी; आपल्या सर्वांच्या अंतरंगात असलेली शांतता आणि उद्दिष्ट कसं प्राप्त करावं हे उलगडतं. जय शेट्टी अमूर्त, गूढ असा बोध आपल्याला वापरता येण्याजोग्या सल्ल्यांच्या आणि स्वाध्यायांच्या रूपात आपल्यासमोर मांडतात. जेणेकरून आपला तणाव कमी होईल, नाती फुलतील आणि आपल्या अंतरंगात असणारे उपहार आपण जगाला देऊ शकू. प्रत्येक जणच संन्याशासारखा विचार करू शकतो आणि त्याने तो करावा, हेच जय शेट्टी सिद्ध करून दाखवतात.

जय शेट्टी हे स्टोरीटेलर, पॉडकास्टर आणि पूर्वाश्रमीचे संन्यासी आहेत. व्हायरल मार्गाने विद्वत्तेचा सर्वांपर्यंत सर्वदूर प्रसार करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. प्रसारमाध्यमांच्या जगाला कलाटणी देणाऱ्या लोकांच्या फोर्ब्जच्या यादीत, 2017मध्ये ‘फोर्ब्ज थर्टी अंडर थर्टी’मध्ये त्यांचा समावेश झाला होता. सहज उपलब्ध होणार्या, प्रसंगोचित आणि व्यवहार्य मार्गाने जगाची कालातीत विद्वत्ता सर्वांना सांगण्याची, तिचा प्रसार करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. शेट्टींनी 400हून अधिक व्हायरल व्हिडिओंची निर्मिती केली आहे आणि त्याला 5 अब्जांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ऑन पर्पज या जगभरातील #1 ‘हेल्थ अँड वेलनेस पॉडकास्ट’चे ते सूत्रसंचालनही करतात.

 

 पुस्तक  Think Like a Monk/संन्याश्यासारखा विचार करा
लेखक  Jay Shetty /जय शेट्टी 
प्रकाशक  Manjul Publishing House.
पानांची संख्या  364
ISBN 978-93-90085-24-8

We Also Recommend