तिहेरी तलाक ( Tiheri talak )- कलीम अजीम
इस्लामने आपल्या स्त्रियांना आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेला मान्य होण्याइतपत स्वातंत्र्य आणि हक्क दिले आहेत. परंतु, इस्लामच्या नावानेच रूढ झालेल्या ' तिहेरी तलाक' च्या प्रथेतून त्यांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणली गेली. त्यासाठी कुरआन बाह्य तरतुदींचा आधार घेण्यात आला. मुस्लीम पुरुष सत्तेने लादलेल्या या गैर इस्लामिक प्रथेमुळे प्रेषित मुहंमद (स) यांच्या समाजसुधारणेचे आणि स्त्री मुक्तीसाठी मांडलेले विचार अर्थहीन झाले.
इस्लामने स्त्रियांना तलाक (खुला) घेण्याचा अधिकार दिला आहे, त्याला पतीच्या परवानगीची गरज नाही ; पण गेल्या काही वर्षांपासून तलाक रद्दबातल करण्याच्या निमित्ताने इस्लामच्या तरतुदीबद्दल अपसमज पसरवत मुस्लिमांना, पर्यायाने इस्लामला शत्रुस्थानी आणले गेले. मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देण्याचे ढोल बडवून पालकाच्या प्रश्नांचे राजकारण करण्यात आले. त्यामुळे मूळ समस्या 'जैसे थे' अवस्थेत राहून एकतर्फी घटस्फोटाचा गुंता आणि गैरसमज वाढत गेला.
कोणीही या प्रश्नांच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केल्याचे आढळत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून तलाक प्रश्न समजून घेत, या प्रश्नातल्या गुंतागुंतीची उकल करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ समस्येला इस्लामी न्यायशास्त्र, कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, लोकशाही, राज्यघटना, धर्म आणि सामाजिक विरेचन अशा वेगवेगळ्या कोनांमधून समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
प्रकाशक | डायमंड पब्लिकेशन |
---|---|
ISBN | 9789386401823
|
पुस्तकाची पाने | 261 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |