
उर्मिला- सीतेच्या बहिणीची कथा -कविता काणे
ही कथा ऊर्मिलेची आहे. रामायणात तिच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालं आहे. जशी सीता रामाबरोबर वनवासात गेली, तशी ऊर्मिलादेखील लक्ष्मणाच्या पावलावर पाऊल टाकत वनवास पत्करू शकली असती; परंतु तिने तसं केलं नाही. पतीच्या विरहामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा सामना करताना तिने दाखवलेला खंबीरपणा कौतुकास्पद होता. लक्ष्मणाची वाट पाहत चौदा वर्षांचा प्रदीर्घ काळ एकटीने राजप्रासादात घालवण्याचा निर्णय ऊर्मिलेने का घेतला? ऊर्मिलेने सांगितलेली ही जीवनकथा तुम्हाला नक्कीच मोहित करेल.
‘कर्णाज् वाईफ - द आउटकास्ट्स क्वीन’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका म्हणजे कविता काणे. पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर आता त्यांनी आपला पूर्ण वेळ कादंबरी लेखनाला वाहून घेतला आहे. इंग्रजी साहित्य आणि पत्रकारिता या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. रंगभूमी आणि सिनेमाविषयी त्यांना अतिशय प्रेम असून त्या त्यातील तज्ज्ञ आहेत.
पुस्तक | उर्मिला- सीतेच्या बहिणीची कथा |
---|---|
लेखक | कविता काणे |
अनुवादक | डॉ. सुचिता नांदापुरकर फडके |
प्रकाशक | मंजुळ पब्लिशिंग हाऊस |
ISBN |
9789390085989 |
पुस्तकाची पाने | 340 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |