विचार तर कराल? ( Vichar Tar Karal? ) - लेखक :  डॉ. नरेंद्र दाभोलकर

विचार तर कराल? ( Vichar Tar Karal? ) - लेखक : डॉ. नरेंद्र दाभोलकर

  • Rs. 155.00
    Unit price per 
  • Save Rs. 20
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 

प्लँचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य
रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा.
अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा ऑक्टोपस –
शोषण करणारा.
या लेखनात पानोपानी आहेत त्यावर
आरपार प्रकाशझोत.
पण त्याचबरोबर आहे
अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे
एक निखळ प्रामाणिक आवाहन.

राजकीय आणीबाणीपेक्षा ही
अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड.
बंधनं जाणवत असली की, माणूस
त्याविरुद्ध लढावयाल उभा राहतो.
परंतु, बंधनांतच प्रतिष्ठा, धन्यता वाटू लागली तर ?
विचारस्वातंत्र्याचे आत्मसत्त्वच हिरावून घेणा-या
धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात.

एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे.

हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे
घोँघावत आहेत.
आज मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे.
आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता.

आपला आपण स्वतःशीच शोध घ्या.
बुद्धीला कौल लावा.
मूल्यभावनेला प्रतिसाद द्या.
आव्हानाला सामोरे जाणा-या
लोकयात्रेत सामील व्हा..
कारण –
माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात.
आणि
माणसानेच समाज घडवत असतात व बदलत असतात.

Weight 182 g
ISBN

978-81-7434-768-8

पुस्तकाची पाने

159

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग


We Also Recommend