वाघाच्या पाऊलखुणा -राधेश्याम जाधव
वाघाच्या पाऊलखुणा हे पुस्तक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय
प्रवासाचा वेध घेते. देशाच्या राजकीय क्षितिजावर नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या उदयानंतर हिंदुत्वाची बदललेली मांडणी आणि राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर त्याचे नव्याने
शोधले जाणारे अन्वयार्थ या पार्श्वभूमीवर रेखाटलेला उद्धव यांचा प्रवास चित्तवेधक आहे.
व्यावसायिक छायाचित्रकारापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंतची उद्धव यांची वाटचाल
विलक्षण आहे. पण ही केवळ उद्धव यांची कथा नाही. महाराष्ट्रात भगवे वादळ निर्माण करणारे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या वाघाची आणि तो वारसा व राजकीय सत्ता मिळवण्यासाठी
कुटुंबात रंगलेले महाभारत असहायपणे पहावे लागलेल्या भीष्म पितामहांची ही गोष्ट आहे.
भारतीय राजकारणात घडलेल्या मोठ्या उलथापालथीची ही कहाणी आहे. भारतीय जनता
पक्षासोबतची तीस वर्षांची युती तोडून शिवसेनेने शरद पवारांचे बोट कसे पकडले आणि सोनिया
गांधींच्या काँग्रेसचा हात कसा हातात घेतला, याची ही सुरस कथा आहे. हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर
घेतलेल्या दोन पक्षांमध्ये रंगलेल्या भाऊबंदकीत करावे तरी काय अशा दुविधेत सापडलेल्या राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे उपकथानकही त्यात आहे.
विविध माध्यमांमधील आशयाचा धांडोळा घेत आणि असंख्य घडामोडींचे धागेदोरे उलगडत उद्धव
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या भगव्यावर सेक्युलर (इहवाद/धर्मनिरपेक्षता)
रंग कसा चढत गेला, याचे मनोज्ञ दर्शन डॉ. राधेश्याम जाधव यांनी या पुस्तकात घडवले आहे.
पुस्तकाचे नाव | वाघाच्या पाऊलखुणा /Waghachya Paulkhuna |
---|---|
लेखक | डॉ. राधेश्याम जाधव / Dr. Radheshyam Jadhav |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
9789354352577 |
पुस्तकाची पाने | 180 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |