
तुमच्या मृत्युनंतर कोण रडणार आहे ? ( Tumachya mrutyunantar kon radnar aahe ?) -रॉबिन शर्मा
"जेंव्हा तुमचा जन्म होतो तेंव्हा तुम्ही रडता आणि सगळे जग आनंदते. तुमचे आयुष्य अशारितीने जगा की जेंव्हा तुम्ही मराल त्यावेळी हे जग रडेल आणि तुम्ही आनंदात जाल."
प्राचीन संस्कॄत म्हण
वर दिलेल्या हया सर्वोत्कॄष्ट ज्ञानामुळे तुमच्या अंतर्मनाची तार छेडली आहे का? तुम्हांला असे वाटते आहे का की जीवन तुमच्या हातून लवकर निसटून चालले आहे आणि तुमच्या योग्य आनंदी अर्थपूर्ण आणि सुखी जीवन जगायची संधी तुम्हांला परत कधीच मिळणार नाही, असे असेल तर लिडरशिप गुरु रॉबीन शर्मांनी लिहिलेले हे वैशिष्टपूर्ण पुस्तक, ज्यांनी द मॉंक हू सोल्ड हिज फेरारी लिहिले आहे व ज्या पुस्तकामुळे हजारो लोकांचे जीवन बदलले आहे, तुम्हांला जीवन नवीन मार्गाने जगण्यासाठी मार्गदर्शक बनेल . हया पुस्तकात रॉबीन शर्मांनी तुम्हांला तुमच्या जीवनातले सर्वांर जास्त अवघड प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपी १०१ तंत्र दिली आहेत, ज्यामध्ये तणावमुक्तीसाठी आणि काळजीमुक्त जीवन जगण्यासाठी खूप थोडया लोकांना माहीत असलेल्या तंत्रापासून ते तुमचा वारसा जपण्यासाठी अतिशय उपयुक्त व आनंदाने मार्गक्रमण करण्याची तंत्र दिलेली आहेत.
रॉबिन शर्मा हे जगभरातील वाचकांच्या आवडीचे लेखक आहेत. त्यांच्या ११ पुस्तकांच्या ६० देशात आणि ७० भाषेत लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. अत्यंत प्रभावी भाषेत ब्लॉग्ज लिहिणारे एक नामांकित विचारवंत म्हणून ते सामाजिक जीवनात ओळखले जातात. शिवाय ते श्रोत्यांच्या पहिल्या पसंतीचे वक्ते आहेत.
प्रकाशक |
जायको पब्लिशिंग हाऊस |
ISBN |
9788179926949 |
पुस्तकाची पाने |
248 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |