Previous
Previous Product Image

कोण आहे भारत माता? पुरुषोत्तम अग्रवाल

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.
Next

मी हिंदू असू शकत नाही-भंवर मेघवंशी

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Next Product Image

जीन मशीन-वेंकी रामकृष्णन

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

मनोरंजक आणि त्याच बरोबर विचार प्रवर्तक असणारे ‘जीन मशीन’ हे पुस्तक विज्ञानाच्या विश्वावर अनेक दिशांनी प्रकाश टाकते. स्वतः लेखक, प्रथिन कसे निर्माण होते याचा शोध लावून त्या विषयातील एक महत्त्वाचे संशोधक ठरले. विसाव्या शतकामध्ये जीवशास्त्रामधील एका सखोल रहस्यावर संशोधनाचा प्रकाशझोत पडून ते कसे उजळले, हे त्यांच्या शब्दांतून आपल्या समोर येते. यामध्ये विज्ञानातील ओघवत्या कथेचा प्रवाह तर आहेच पण त्यातील मानवी पैलूही तितकेच मनोवेधक आहेत. ‘डबल हेलिक्स’ या गाजलेल्या कहाणीच्या परंपरेला ‘जीन मशीन’ पुढे नेते. विज्ञान कसे विकसित होते, त्यात कशा अडचणी येतात, नवे आयाम कसे जोडले जातात, स्पर्धा कशी निर्माण होते अन् छुपे शत्रुत्व कसे प्रवेश करते, शेवटी सशक्त सत्य कसे प्रगटते यांचा वेध घेतलेला आहे. आधी रायबोसोम जीवशास्त्राच्या संशोधन
विश्वाबाहेर असलेले एक भारतीय स्थलांतरित आणि मूळचे पदार्थविज्ञान विषयाचे अभ्यासक असलेले वेंकी रामकृष्णन यांनी आपल्या भूमिकेच्या बाहेर येऊन पुस्तकभर आपली तटस्थ नजर राखलेली आहे. विज्ञानाच्या जागतिक क्षेत्रातही अत्युच पुरस्कार देताना कसे राजकारण केले जाते, त्यामागे किती अन् कशी स्पर्धा असते, (या दोन्ही गोष्टी आजच्या प्रगत विज्ञानाच्या संस्कृतीवर अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम करतील असा माझा होरा आहे) हे दर्शवताना रामकृष्णन यांचा प्रामाणिक प्रयत्न इतका गुंतवून ठेवतो की, मला हे पुस्तक संपूर्ण वाचेपर्यंत खाली ठेवता आले नाही.
– सिद्धार्थ मुखर्जी

(‘द जीन’ आणि ‘एम्परर ऑफ ऑल मॅलडीज’ या पुस्तकांचे लेखक)
रायबोसोम हा सजीवांच्या वैश्विक यंत्रणेचा, संगणकाच्या भाषेत सांगायचे तर जणू ‘सेंट्रल प्रोसेसर’ म्हणजे ‘मध्यवर्ती प्रक्रमक संयंत्र आहे. ते जनुकीय सांकेतिक लिपी वाचते अन् सजीवतेच्या क्रिया पार पाडते. त्याचा इतिहास हा डीएनएच्या इतिहासाइतकाच रोमांचक आहे. तुम्ही वेंकी रामकृष्णन यांना ‘सरस जिम वॅटसन’ असे म्हणू शकाल! वेंकी यांनी त्यांच्या तपशीलवार आठवणी, ‘द डबल हेलिक्स’ या पुस्तकाइतक्याच खुल्या मनाने लिहिलेल्या आहेत, आपली वैयक्तिक स्पर्धात्मक महत्त्वाकांक्षा त्यांनी प्रामाणिकपणे यात उलगडली आहे. मोठे पुरस्कार मिळविणे ही आकांक्षा बुद्धिमान मनाला एकाच वेळी कार्यप्रवण करते, वैचारिक चालना देत आणि स्वार्थीही बनवते असे भाष्य ते करतात, ‘जीन मशीन’ हे पुस्तक विज्ञानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वृत्तांत म्हणून पुन्हा पुन्हा वाचले जाईल.
– रिचर्ड डॉकिन्स

Hurry! only 99 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जीन मशीन-वेंकी रामकृष्णन”

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − thirteen =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping