आई-बाबाची डायरी – डॉ. श्रुती पानसे
₹170.00 Original price was: ₹170.00.₹153.00Current price is: ₹153.00.
पालकत्व निभावताना आई-बाबा दोघांचीही स्वतंत्र लढाई असते. सध्याच्या काळात बाबासोबत आईही आता कमावती, घरची कर्ती स्त्री झालेली आहे. त्यामुळे मुलांच्या संगोपनात बाबाही दोन पावलं पुढे सरकला आहे. मुलांच्या जन्मात, संगोपनात जमेल तसा वेळ देतो, मनापासून त्यांचा अभ्यास घेतो. मुलांना वाढवण्यासाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी शिकून घेतो. कधी कधी मुलांना शिस्तीच्या आईपेक्षा मऊ स्वभावाचा आणि मुलांचं सर्व काही ऐकणारा बाबा हवासा वाटतो. अशी ही बाबाची बदललेली भूमिका खूपच लोभसवाणी आहे. या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या त्यांच्या डायरीत मोकळेपणाने मांडल्या आहेत. त्या समस्यांवर आपल्या बुद्धीने मार्ग काढला आहे. ही डायरी वाचून पालकत्व निभावताना आई-बाबाला नक्कीच दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Sakal Prakashan, सामाजिक
Tags: Aai-Babachi Diary, Dr. Shruti Panase, आई-बाबाची डायरी, डॉ श्रुती पानसे
Reviews
There are no reviews yet.