बिईंग द चेंज- आशुतोष सलिल, बरखा माथूर
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
महात्मा गांधीजींच्या १५३व्या जयंतीनिमित्त त्यांच्या मार्गावरून जाणाऱ्या लोकांच्या गोष्टी या पुस्तकात एकत्रित केल्या आहेत. फारशा जगापुढे न आलेले हे लोक समाजात बदल घडवून आणण्याच्या ध्येय्याने झपाटलेले आहेत. ‘खरा भारत खेड्यात आहे आणि जर गरिबांची सेवा करायची असेल, तर खेड्यात जाऊन काम करायला हव’, हा महात्मा गांधीजींचा आदेश शिरोधार्य मानून त्यांनी त्यांच्या आयुष्याची दिशा ठरवली. बापूंचा आदर्शवाद प्रत्यक्ष जीवनात अंगीकारून आयुष्य समृद्ध होतं आणि समाजालाही त्याचा फायदा होतो हे या लोकांनी त्यांच्या जगण्यातून सिद्ध केलंय.
या पुस्तकात ज्या लोकांच्या गोष्टी आहेत ते लोक प्रकाशझोतात नाहीत. सत्याग्रह आणि अहिंसा या गांधीजींच्या शस्त्रांचा वापर करून ते कार्यरत आहेत. आजही या दोन गोष्टी तुम्हाला दीनदुबळ्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी आहेत, हे त्यांच्या कार्याशैलीतून दिसून येतं. यातल्या बर्याच जणांना पुरस्कार मिळालेत; पण तरीही त्यांच्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत फारशा पोहोचलेल्या नाहीत. बिइंग द चेंज हे पुस्तक त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू इच्छित आहे.
Reviews
There are no reviews yet.