ब्रेकिंग द मोल्ड – रघुराम राजन, रोहित लांबा
₹499.00 Original price was: ₹499.00.₹450.00Current price is: ₹450.00.
भारताच्या प्रगतीची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे? इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे याचा अर्थ भारताची प्रगती होत आहे असा होतो का? लक्षावधी बेरोजगारांना रोजगार पुरवण्यास आलेल्या अपयशामुळे अर्थव्यवस्थेची पिछेहाट होत आहे का? उज्ज्वल भवितव्यासाठी आपण काय केले पाहिजे?
भारत आज एका चौरस्त्यावर येऊन पोहोचला आहे. भारताच्या आर्थिक वाढीचा दर कित्येक मोठ्या देशांच्या तुलनेत जास्त असला तरी देशातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी तो खूपच कमी आहे. कमी कौशल्याच्या वस्तुनिर्माण क्षेत्रातील तीव्र स्पर्धा, स्वदेशात वस्तुनिर्मिती करण्याकडे, संरक्षणवादाकडे झुकत चाललेला जागतिक कल, आणि वाढते स्वयंचलितीकरण यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झालेली आहे. समाजात फूट पाडणाऱ्या बहुसंख्याकांच्या तुष्टीकरणातून काहीच साधले जाणार नाही. आजवर आर्थिक विकासाची वाटचाल कृषी क्षेत्राकडून कमी कौशल्याचे वस्तुनिर्माण, त्यानंतर उच्चकौशल्याधारित वस्तुनिर्माण आणि सेवा-क्षेत्र अशी होत आलेली आहे. विकासाच्या राजमार्गातील मधल्या पायरीवरून उडी मारून आपण केव्हाच पुढे आलो आहोत. असे असताना परत मधली पायरी गाठण्यासाठी उलट फिरण्याऐवजी आपल्याला ‘स्वतःचा’ भारतीय मार्ग शोधून काढला पाहिजे
Reviews
There are no reviews yet.