इंडिका – प्रणय लाल
Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00.
भारतीय उपखंडाचा पहिलावहिला निष्कर्षात्मक नैसर्गिक इतिहास
तुम्हाला माहित्ये का वेरूळची अप्रतिम लेणी ज्या खडकातून कोरून काढली आहेत तो खडक आत्तापर्यंत जगात घडून आलेल्या सर्वात मोठ्या लाव्हारसाच्या पुरातून निर्माण झाला आहे. ज्वालामुखीचा हा स्फोट एवढा प्रचंड होता की त्यांच्यामुळे डायनॉसॉरही नष्ट होऊ शकले असते, हे माहिती आहे का तुम्हाला? आजच्या बंगळुरुचं आगळं वेगळं हवामान ८.८ कोटी वर्षांपूर्वी पृथीच्या पोटात घडून आलेल्या घडामोडींमुळेच निर्माण झालं आहे हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला ? एवढंच नव्हे तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा जवळजवळ २० टक्के जागतिक कार्बन अलग करतात आणि लाखो वर्षांपासूनच्या त्यांच्या गाळाने बंगालच्या उपसागराच्या तळाशी ग्रँड कॅनियनपेक्षाही मोठमोठ्या दऱ्या निर्माण केल्या आहेत हे ठाऊक आहे का तुम्हाला? तसंच राजासौरास नावाचा भारतीय प्रदेशातील डायनासॉर कदाचित टी रेक्सपेक्षाही भीषण होता हे कधी ऐकलंय का तुम्ही ? अशा कित्येक थक्क करणाऱ्या गोष्टी आणि शोध आहेत. उदाहरणार्थ, मुंबईत ७ कोटी वर्षांपूर्वीची मगरीची अंडी सापडली आहेत, तसंच डायनॉसॉरचं घरटी बांधण्याचं ठिकाण अहमदाबादजवळ होतं……. भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास सांगणाऱ्या ‘इंडिका’चे हे सगळे भाग आहेत.
Reviews
There are no reviews yet.