Previous
Previous Product Image

द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली – सुलभा सुब्रमण्यम

270.00
Next

जातिव्यवस्थेचे उच्चाटन – बी.आर.आंबेडकर

360.00
Next Product Image

लीप फ्रॉग – मुकेश सूद

225.00

कामाच्या ठिकाणी जोरदार प्रगती करण्याच्या संदर्भात लीप फ्रॉग – बेडूकउडी – म्हणजे, एखाद्या नव्याने प्रवेश केलेल्याने आधीच्या सर्वांना मागे टाकून त्याच्या काम करण्याच्या आवाक्याने, कामातील कौशल्याने, नैपुण्याने एकदम उडी घेऊन पुढे जाणे असते. ते कसे करू शकतो तो नवागत? या पुस्तकातील पुराव्यासकट सादर केलेल्या, तशी बेडूकउडी घेण्याची क्षमता अंगी बाणवणाऱ्या सहा पद्धती तुम्हालाही तशी उडी घेऊन पुढे जाण्याची क्षमता देतील.

पहिली पद्धत आहे – अंगी चिकाटी, खंबीरपणा बाणवण्याची आणि त्याबरोबरच अनेक वेळा अनुभवायला लागणाऱ्या एकसुरीपणाचा, कंटाळ्याचा समजूतदारपणे स्वीकार करण्याची. दुसरी पद्धत आहे काही वर्तनपद्धतींमागची कारणे समजून घेऊन, त्यांची काळजी घेऊन, विविध उपाय वापरून स्वतःला योग्य वर्तनासाठी उद्युक्त करण्याची, प्रोत्साहित करण्याची. तिसरी पद्धत आहे आपल्या ज्ञानाच्या सीमांची जाण ठेवून आपल्या बुद्धिमत्तेविषयी विनयशीलता बाळगण्याची. चौथ्या पद्धतीत अनेक क्षेत्रांमध्ये मुक्त नर्तन करतकरत कल्पनांच्या शृंगारातून नव्या कल्पनांच्या जन्माची अनोखी संकल्पना मांडली आहे. त्यानंतर सभोवतालच्या गोंधळाविषयी, अतोनात पसाऱ्याविषयी सावध करून त्यातील अनावश्यक, बेडेपणाचे जे-जे असते ते ते काढून टाकून आपल्याशी संबंधित आणि आपल्याला अत्यावश्यक असलेल्या गोष्टींची विचारपूर्वक निवड करून त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पटवून दिली आहे. शेवटची पद्धत तुम्हाला नव्या उद्योजकासारखा विचार करायला शिकवते आणि आपल्याला जे हवे असते, जाणून घ्यायचे असते, ते धाडसी उत्साहाने विचारण्याचे महत्त्व सांगते.

विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या, त्यांना मार्गदर्शन करण्याच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर लेखकद्वयीने ‘पर्सनल जनीं मॅप’ पीजेएम वैयक्तिक प्रवासाचा नकाशा – अशी एक संकल्पना शोधली आहे. या नकाशाचे तीन भाग आहेत: पहिला तुमची आत्ताची कार्यक्रमपत्रिका, दुसरा तुम्ही समोर ठेवलेले पुढील काळाचे चित्र, साध्य करायची ठरवलेली उद्दिष्टे आणि आणि तिसरा पूर्ण विचार करून ते चित्र पूर्ण करण्यासाठी, ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नक्की केलेला पुढील मार्ग. हा नकाशा आधी मांडलेल्या सहा पद्धती आत्मसात करायला आणि वापरात आणायला मदत करतो, तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बेडूकउडीच्या वेगाने कितीतरी अंतर लीलया पुढे घेऊन जातो.

Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लीप फ्रॉग – मुकेश सूद”

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − twelve =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping