पालकांसाठी ३ पुस्तकांचा संच
₹725.00 Original price was: ₹725.00.₹650.00Current price is: ₹650.00.
लहान मुलं असणाऱ्या प्रत्येक घरात असलाच पाहिजे असा ३ पुस्तकांचा संच…
प्रत्येक पालक आणि शिक्षकाने वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं.
१) सारं काही मुलांसाठी
– शोभा भागवत (गरवारे बालभवन -संचालिका, अक्षरनंदन, हुजूरपागा अश्या नामांकित शाळांच्या सल्लगार)
किंमत २५०
आपण पालक मुलांना कधी ही पाच वाक्यं लक्षात ठेवून सांगतो का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू हे किती छान केलंस. तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं. सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं. पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! तेव्हा पालकांनो, मुलांसाठी सारं काही करताना सोबतच हेही करा.
२) अधिक सुजाण पालकत्वासाठी पालकशाळा
– डॉ. श्रीराम गीत (प्रसिद्ध करिअर कौन्सलर, डॉक्टर)
किंमत २२५
पालकशाळा या पुस्तकातून मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, समुपदेशक, शिक्षण अभ्यासक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पालकत्वाचे हे विविध पैलू उलगडून दाखवलेले आहेत. पालक म्हणून दैनंदिन स्वरूपात आपल्यासमोर असणारे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीचे विविध पर्याय मांडलेले आहेत. हे पुस्तक आपला मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक तर करतंच पण त्याचबरोबर मुलांच्या अंगभूत क्षमता, वयाच्या विविध टप्प्यांवर त्यांना येणार्या अडचणी, शारीरिक मानसिक बदल, त्याचे होणारे परिणाम आणि अर्थातच त्यातून निर्माण होणारे प्रश्न यांच्या सोडवणुकीचे मार्गही दाखवतं. नवे शास्त्राधार समजावून देत मुलांच्या बुद्धिमत्ता विकासाचे विविध पर्याय समोर ठेवतं, मुलं आणि करियर या संदर्भातले तिढे सोडवण्यासाठी मदत करतं. पालकत्वासंदर्भातली आपली जाणीव अधिक व्यापक करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे.
३) असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्व
– डॉ. रमा मराठे (मानसोपचार तज्ञ)
किंमत २५०
दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही.
वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व
कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच
उपयोगी पडेल. भरभक्कम मानसशास्त्रीय बैठक अन् मुलं व पालक दोघांशीही संवाद साधण्याचा लेखिकेचा दैनंदिन अनुभव यावर आधारित हे पुस्तक संग्रही ठेवावं व मुलांशी वागताना वारंवार वाचावं असं आहे.
एकूण ७२५ रु किंमतीचा संच ६५० रु मध्ये घरपोच मिळेल.
कुरियरसाठी कोणतेही चार्जेस नाहीत.
Reviews
There are no reviews yet.