स्टोरीज आय मस्ट टेल – कबीर बेदी
₹499.00 ₹449.00
या पुस्तकातील कथा अतिशय रोखठोक आहेत. ज्याने प्रेमात किंवा आत्मकथनात काहीच हातचं राखलं नाही, अशा माणसाच्या या लक्षवेधी आठवणी आहेत. ही कहाणी आहे दिल्लीतील एका मध्यमवर्गीय अशा मुलाची ज्याचे कार्यक्षेत्र आज जगभर विस्तारले आहे. या पुस्तकातून कबीर बेदी आपलं अंतःकरण उघडे करतो. दिल्लीतील बीटल्स बरोबरची जादूभरी भेट – मित्र, घर आणि कॉलेज; सारं मागे सोडून मुंबईला घेतलेली धाव – जाहिरात क्षेत्रात त्याने व्यतीत केलेली उद्दीपित करणारी वर्षं; परदेशात मिळवलेले नेत्रदीपक यश आणि अनेक वेदनाकारक पिछेहाटी. अनिवार आयुष्य जगणारी प्रतिमा बेदी आणि झळाळणारी परवीन बाबी यांच्याशी त्याचे जुळलेले आणि विस्कटलेले भावबंध – त्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्या संबंधांतून त्याच्या मनावर उमटलेल्या जखमा आणि त्याने घेतलेल्या तीन घटस्फोटांनी केलेली त्याच्या जीवाची ससेहोलपट आणि अखेर त्याला मिळालेले समाधान आणि तृप्ती! त्याच्या सर्व श्रद्धा कशा आणि का बदलल्या हेही या आत्मकथनातून स्पष्ट दिसते.
Related products
-
Add to WishlistAdd to Wishlist
-
-
-
Reviews
There are no reviews yet.