Previous
Boardroom-Madhushree-publication-Vaachan.com

बोर्डरूम-अच्युत गोडबोले, अतुल कहाते

255.00
Next

येरवडा विद्यापीठातील दिवस- कुमार सप्तर्षी

385.00
Yerwada-Karagruhatil-divas-kumar-saptarshi-.

द ओल्ड मॅन अँड द सी | परका

550.00

१) द ओल्ड मॅन अँड द सी
लेखक: अर्नेस्ट हेमिंग्वे
भाषांतर: भारती पांडे

साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेली लघुकादंबरी

‘आशा न करणं मूर्खपणाचं आहे, ते पाप आहे असं त्याचं म्हणणं होतं.’

हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा. हेमिंग्वेची ही उत्कृष्ट
कथा आहे एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची
कहाणी. या कमालीच्या शौर्यकथेने हेमिंग्वेला साहित्याचे नोबेल पारितोषिक
मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे,
त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन
म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल…
———————————————
२) परका
लेखक: आल्बेर काम्यू
भाषांतर: अवधूत डोंगरे
१९३०-४०च्या दरम्यान अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या मेर्सोच्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या
दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी-
अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो
नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग
असतो. मग समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो.
त्याच्या विरोधात खटला उभा राहतो.

हे सगळं कसं होत जातं? खून का होतो ? खटल्यात काय होतं? या
सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्सोच्या तोंडून सांगणारी ‘परका’ ही आल्बेर
काम्यू यांची कादंबरी फ्रेंच भाषेत ‘लेत्रांजे’ म्हणून १९४२ साली प्रसिद्ध
झाली. इंग्रजीत ‘द आउटसायडर’ म्हणून तिचं भाषांतर झालं. १९५७
साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या आल्बेर काम्यू यांची
ही कादंबरी वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत
राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्षं झाली असली, तरी
आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थांना वाव देणारी ठरावी.

दोन्ही कादंबऱ्यांची एकूण किंमत ६०० रु, विशेष सवलतीत ५५० रु. मध्ये घरपोच.
कोणतेही कुरियर चार्जेस नाहीत.

Hurry! only 987 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द ओल्ड मॅन अँड द सी | परका”

Your email address will not be published. Required fields are marked *

one × one =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping