Previous
Previous Product Image

गरुड़ पुराण – देवदत्त पट्टनाईक

270.00
Next

फोकस ऑन व्हॉट मॅटर्स – डारियस फरु

225.00
Focus on what matters Darius Foroux

आपल्याला काय त्याचं – श्वेता सीमा विनोद

130.00

 

एका तरुणाच्या आंतरिक बदलाची व लिंग समानता कृतीमध्ये आणण्यासाठी
विचारपूर्वक आणि सातत्याने स्वतःला तपासून घेत माणूस बनण्याचा प्रवास उलगडून
दाखवणारी श्वेता सीमा विनोद या तरुण लेखिकेची ‘आपल्याला काय त्याचं…’ ही
कादंबरी आहे. ग्रामीण भागातील एक तरुण पुण्यात नोकरी करताना समाजासाठी काही
काम करू पाहणाऱ्या ‘संवाद टीम’ मध्ये सामील होतो व आपण कसे स्त्रीला दुय्यम
समजणाऱ्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे वाहक आहोत याचं त्याला रुपाली या साफ व
सुस्पष्ट विचार करणाऱ्या व सतत प्रश्न विचारणाऱ्या, संवाद साधणाऱ्या मैत्रिणीमुळे
आत्मभान येतं आणि तो जे अनुभवतो, पाहतो, त्यानं बदलत जातो. या त्याच्या
लिंगनिरपेक्ष मनुष्य बनण्याच्या प्रवासाचे उत्कट व वास्तवदर्शी चित्रण या कादंबरीत
कुठेही ‘प्रीची’ न होता सहजतेने आलं आहे. प्रेम, मैत्री, लिंग समानता, बॉडी शेमिंग,
घरामध्ये वडीलधाऱ्यांनी स्त्री-पुरुष असमानतेचे “जेंडर स्टीरिओटाइपिंगचे” पाठ
मुलांना पढविणे, ही आज पण असणारी समाजस्थिती. शिक्षण व आर्थिकदृष्ट्या
स्वावलंबी आणि आधुनिक झालेली सावित्रीची लेक आजच्या काळात समानता
मागते, पण शिक्षित असला तरी सहजतेने मिळणारे पुरुषी प्रिविलेजेस न सोडणारा
जोतीबाचा लेक अजूनही बदलायला सहजतेने तयार होत नाही, हे आजचे एकविसाव्या
शतकातलेही वास्तव आहे. त्याला छेद देणारा एका सच्चा जोतीबाच्या लेकाचा या
कादंबरीचा नायक नितीनचा मनुष्य बनण्याचा प्रवास श्वेताने ज्या समर्थपणे चितारला
आहे, तो वाचून वाचकांच्या खासकरून तरुण वाचकांच्या मनात नितीनप्रमाणे
मनुष्यपणाचा प्रवास सुरू करण्याची प्रेरणा निर्माण होईल असा माझा विश्वास आहे!
‘आपल्याला काय त्याचं…’ पासून ‘आपल्याला स्वतःपासून बदलत माणूस
झालं पाहिजे’ हा एक महत्त्वाचा विचार समर्पकपणे दिला आहे. स्त्रीवादाच्या कक्षा
ओलांडत मनुष्यवादाचा पुरस्कार करणारा कादंबरीचा हा मानसिक, कृतिशील व
वैचारिक प्रवास वाचकांना नक्कीच विचारप्रवण करेल. लेखिकेकडून भविष्यात अशाच
चांगल्या साहित्यकृतीची अपेक्षा बाळगाव्यात असा विश्वास ही कादंबरी देते.
• लक्ष्मीकांत देशमुख
(अध्यक्ष: ९१ वे अखिल भारतीय मराठी संमेलन, बडोदा २०१८)

Hurry! only 995 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपल्याला काय त्याचं – श्वेता सीमा विनोद”

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + two =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping