रिवर्क – जेसन फ्राईड आणि डेव्हिड हेनमेयर हॅन्सन
Original price was: ₹299.00.₹250.00Current price is: ₹250.00.
हे व्यवसायाविषयीचं आगळ्यावेगळ्या प्रकारचं पुस्तक वेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी आहे. ज्यांनी कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं स्वप्नही पाहिलं नव्हतं अशा आणि ज्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे अशा लोकांसाठी हे पुस्तक आहे.
हे धडाडीनं काम करणाऱ्या ‘अ’ श्रेणीतल्या पक्क्या आंत्रप्रेनर्ससाठी आहे. व्यवसाय सुरू करणं, व्यवसायाचं नेतृत्व करणं आणि त्या क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट होणं यांसाठीच आपला जन्म झालाय असं ज्यांना वाटतं; त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे.
जे अगदी ‘अ’ श्रेणीतला व्यवसाय करत नाहीत, पण व्यवसाय हीच गोष्ट ज्यांच्या जीवनात केंद्रस्थानी आहे, त्या थोड्या लहान व्यावसायिकांसाठीही हे पुस्तक आहे. ठरावीक मर्यादेच्या पलीकडे जाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना हे पुस्तक प्रगती करायला, चाणाक्षपणे काम करायला आणि झेप घ्यायला मदत करेल.
चाकोरीबद्ध नोकरी करतानाही ज्यांनी आपलं स्वतःचं काही तरी करायची स्वप्नं उराशी बाळगली आहेत, त्यांच्यासाठीही प्रस्तुत पुस्तक आहे. ते जे करताहेत ते त्यांना कदाचित आवडत असेल पण त्यांना त्यांच्या भोवतीची परिस्थिती आवडत नसेल किंवा त्यांना फक्त कंटाळा आला असेल. एखाद्या गोष्टीवर प्रेम आहे आणि तीच गोष्ट करून त्यातून पैसे मिळवायची इच्छा असणाऱ्यांसाठीही हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.