जीवनाशी संवाद – कुमुद करकरे
₹300.00 ₹270.00
२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर १९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
Related products
-
-
Add to WishlistAdd to Wishlist
-
-
Reviews
There are no reviews yet.