लोकशाहीचे वास्तव & गिधाडांची मेजवानी – जोसी जोसेफ
₹700.00 Original price was: ₹700.00.₹599.00Current price is: ₹599.00.
रितसर कामांसह गैरकृत्यांसाठी मध्यस्थांची यंत्रणा कशी काम
करते आणि त्यातून भारतीय लोकशाहीतील काळे कारनामे
कसे आकाराला येतात यांचा शोधपत्रकार जोसी जोसेफ यांनी घेतलेला शोध
१) लोकशाहीचे वास्तव
किंमत : ३५०
१९८० आणि १९९० च्या दशकांमध्ये भारतभर बंडखोरीची लाट उसळली आणि ती हळूहळू पसरत गेली.
तिच्याशी दोन हात करताना संपूर्ण संरक्षणयंत्रणेला संघर्ष करावा लागला. त्या लाटेखाली
गुदमरून गेल्यामुळे पोलीस दल, गुप्तवार्ता यंत्रणा, केंद्रीय तपासयंत्रणा, कर विभाग आणि इतर
यांनी काही अभिनव कल्पना शोधून काढल्या; ज्यांचं स्वरूप कधीकधी भयानकही होतं : खोटे
किंवा काल्पनिक पुरावे तयार करण्यापासून दहशतवादी हल्ले करणं आणि चक्क दहशतवादी
संघटना तयार करण्यापर्यंत ही मजल गेली. कालांतरानं, दहशतवाद म्हणजे भरभराटीचा, अनेक
कंगोरे असलेला एक धंदा झाला.
काश्मीरमधल्या दहशतवादापासून श्रीलंकेतल्या नागरी युद्धापर्यंत, मुंबईवर झालेल्या हल्ल्यापासून
ईशान्य भारतात अनेक दशकं सुरू असलेल्या बंडखोरीपर्यंत, भारताचं दहशतवादाशी युद्ध सुरूच
आहे. त्यामुळेच, देशाची संरक्षणयंत्रणा अधिकाधिक राष्ट्रवादी आणि अराजकतावादी झालेली
आहे, आणि भ्रष्टदेखील. यातला सगळ्यांत धोकादायक भाग असा, की गुप्तचर यंत्रणा, पोलिस
दल, गुप्तवार्ता विभाग यासह जवळपास संपूर्ण संरक्षण यंत्रणा ही राजकारण्यांच्या
हातात गेलेली आहे.
बंडखोरी, दहशतवाद आणि संरक्षणयंत्रणा यांनुषंगाने सुमारे दोन दशकं पत्रकारिता केल्यावर तयार
झालेलं ‘लोकशाहीचे वास्तव’ हे पुस्तक म्हणजे देशाला दिलेली हाक आहे.
२) गिधाडांची मेजवानी
किंमत : ३५०
रितसर कामांसह गैरकृत्यांसाठी मध्यस्थांची यंत्रणा कशी काम
करते आणि त्यातून भारतीय लोकशाहीतील काळे कारनामे
कसे आकाराला येतात यांचा शोध या पुस्तकातून घेण्यात
आलेला आहे.
शोधपत्रकारिता करणाऱ्या जोसी जोसेफ यांनी मागील दोन
दशकांत या समस्येची व्यापकता कशी वाढली आहे
हे उघडकीस आणले आहे. त्यातून समोर आलेले चित्र
स्फोटक आणि भयावह आहे.
आधुनिक भारताचा याआधी कधी घेण्यात न आलेला अनेक
पातळ्यांवरचा शोध म्हणजे गिधाडांची मेजवानी हे पुस्तक आहे.
ते वाचकांना अस्वस्थ करते, कृतिप्रवण करते, परिवर्तनासाठी
आक्रोश करायला भाग पाडते. लोकशाहीबद्दल काळजी
असणाऱ्या तसेच देशात घडलेल्या घडामोडींमागे दडलेले
सत्य समजून घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाने
हे पुस्तक वाचले पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.