द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट
Original price was: ₹250.00.₹210.00Current price is: ₹210.00.
भारतामधले सगळ्यांत नामांकित गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला नेहमी, ‘शेअर बाजाराचा आदर करा. आपलं मन खुलं ठेवा. आपण काय पणाला लावू शकतो याची जाण बाळगा. कधी नुकसान सोसून मोकळं व्हायचं हे समजून घ्या. एकूणच जबाबदार व्हा.’ असं म्हणत असत.
‘बिग बुल’ म्हणून विख्यात असलेल्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर माणूस आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही बाबतींमध्ये हे पुस्तक प्रकाश टाकतं. त्यांच्या प्रवासाची भन्नाट कहाणी रेखाटत त्यांच्या गुंतवणुकीचं ते विश्लेषण करतं आणि त्यांनी दिलेल्या मुलाखतींचंही विवेचन करतं. हे पुस्तक म्हणजे, फक्त त्यांचं चरित्र नसून त्यांना लखलाभ ठरणाऱ्या गुंतवणुकींचं ते विस्तारानं विवेचन करतं आणि त्यांच्या चुकांचंही वर्णन करतं. या सुप्रसिद्ध गुंतवणूकदाराच्या प्रवासाकडे नजर टाकत असतानाच हे पुस्तक सर्वसामान्य गुंतवणूकदारांना महत्त्वाच्या अनेक युक्त्या शिकवून जातं. त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्जं घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्दयांचा समावेश आहे.
Reviews
There are no reviews yet.