Previous
Previous Product Image

१६ इनसायडर 2 – रदीप खेतमार

225.00
Next

ययाती – वि. स. खांडेकर

337.00
Next Product Image

काळ्या मातीच लेकरू – श्रीपाद कोंडे देशमुख

180.00

काव्यस्पंदन अनुभवताना….. जाणवले मनाचे विविध रंग, दरवळली अंगणीची जाई,अनुभवला विरहात तळमळणारा जीव, भेटले हरवलेले स्वप्न अन सुचल्या अमर्याद उपमा…. , …. कवितेमध्ये दिसलं बाईचं कष्टप्रद जगणं आणि बाप नावाचा आधारवड अन नाती दुरावलेल्या दुनियेतलं निखळ मैत्र…. काव्यस्पंदन मध्ये आढळलं आयुष्यातली प्रतिकात्मक सात पावलं चालणं,प्रेमभाव जपणं,तरीही तटस्थपणे आयुष्याकडं पाहणं आणि आयुष्यातल्या वादळांना सामोरं जाणं,… काव्यस्पंदन अनुभवताना…. उमगली शूर वीरांची काव्यमय महानता आणि त्याच बरोबर मनाला भिडलं आदिवासी बालकांचं कुपोषण, कष्टकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणाचं खाजगीकरण, झपाट्याने येणारं जागतिकीकरण त्यात हरवलेलं माणूसपण नि शहराच्या प्रदूषणातून, बाजारू जगातून निसटून गावाकडं परतून जाण्याची ओढ… कविता वाचताना मोहरून टाकलं मनाला श्रावणातल्या सरींनी, गर्द वनराईनी आणि खळखळणाऱ्या निर्मळ प्रवाहांनी… आणि वाटलं झोकून द्यावं स्वतःला त्या किनाऱ्यावर अच्छादलेल्या हिरवाईवर….हिंदोळणाऱ्या जल लहरींवर…. या काव्य संग्रहाच्या अंतिम भागाने मनाला अनंतात ओढलं जणू… इथे आस्वाद घेतला तुकोबांच्या वास्तववादी भक्तीचा… विठोबाच्या पायी सर्व समर्पण करणाऱ्या वारकऱ्याचा…. यातील अनेक कवितांना संगीतबद्ध केलेलं आहे. त्या प्रत्यक्ष कार्यक्रमाची मी साक्षीदार होते….. त्यांची एकेक कविता मनातल्या देवाला शोधत जाते… भक्तीच्या डोहात डुंबून एकोबा, तुकोबाची गाथा होते,.. विजेसारखी लखलखणारी मुक्ताई होते, नामदेवाची जनाई होते… काव्यस्पंदन अनुभवताना मनाला जणू नवी पालवी फुटते…. या समर्पक काव्यसंग्रहाला आणि भावमधुर रचनाकारांना खूप खूप शुभेच्छा…… – अंगाई जगदीश खेबुडकर

Hurry! only 386 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळ्या मातीच लेकरू – श्रीपाद कोंडे देशमुख”

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + fourteen =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping