Previous
Previous Product Image

सदा सर्वदा – सदा डुंबरे

337.50
Next

१६ इनसायडर 2 – रदीप खेतमार

225.00
Next Product Image

नितळ प्रेमाच्या कहाण्या – अंजली कुलकर्णी

225.00

प्रेम माणसाच्या जगण्याला हेतू पुरवतं, अर्थ पुरवतं. स्वतःचा ‘स्व’ दुसर्‍यात विसर्जित करायला शिकवतं. पूर्णपणे शरण जायला शिकवतं आणि अशा ‘स्व’ परस्परांत विसर्जित झालेल्या व्यक्ती परस्परांना प्रेममय बनवतात, भावमय, आनंदमय बनवतात. आणि अशा व्यक्ती समाजातल्या एखाद्या क्षेत्रात, एखाद्या कामात, एखाद्या कलाविषयात झोकून देऊन काम करताना एकत्र आलेल्या असतील; असाधारण विद्वत्ता, प्रतिभा-कला, समाजाविषयी तळमळ, उत्कटता असलेल्या असतील; तर अशा दोन व्यक्तींमधले स्नेह संबंध किती गहिरे असतील? असाधारण संवेदनशीलता, बुद्धिमत्ता, भावनाशीलता यांच्या संयोगातून केवढं प्रगल्भ, सुंदर, भावोत्कट नातं उमलत असेल? हा नातेसंबंध त्या दोन संबंधित व्यक्तींचं आयुष्य तर समृद्धतेनं काठोकाठ भरत असतोच; पण या नातेसंबंधातून कला, ज्ञान, साहित्य, विज्ञान, समाजकारण अशा क्षेत्रांमध्येही भरीव, मौलिक आणि शाश्‍वत काम उभं राहत असतं. या माणसांनी परस्परांना विधायक सकारात्मक सर्जनशील काम करताना केवढी ऊर्जा, केवढं चैतन्य पुरवलं असेल. मग ते नातं नवरा-बायकोतील असो की मित्रमैत्रिणींतील. जगाच्या इतिहासात अशा परस्परांना आणि त्या त्या क्षेत्राला झळाळून टाकणार्‍या प्रेमी जोडप्यांच्या नितळ प्रेमकहाण्या सोनेरी अक्षरांत लिहिल्या गेल्या आहेत. त्यांपैकी या मोजक्या कहाण्या… काही देशी, काही परदेशी तर काही अस्सल महाराष्ट्री. (मनोगतामधून…)

Hurry! only 386 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नितळ प्रेमाच्या कहाण्या – अंजली कुलकर्णी”

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 3 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping