सावरकर भाग २ – विक्रम संपत
Original price was: ₹999.00.₹800.00Current price is: ₹800.00.
‘विक्रम संपत यांनी आता बिनायक दामोदर सावरकरांचे संग्राह्य चरित्र पूर्ण केले आहे… महात्मा गांधींच्या हत्येतील कथित सहभागाबद्दल सावरकरांना भारताच्या इतिहासातून बहिष्कृत केले गेले आहे हे लक्षात घेता, मी विशेषतः गांधीहत्येविषयी लिहिलेल्या प्रकरणाची प्रशंसा करतो. तुमची राजकीय मते काहीही असोत, ऐतिहासिक लेखनाचा एक उत्तम नमुना म्हणून हे पुस्तक वाचायला हवे.’
– मेघनाद देसाई, प्रख्यात लेखक आणि स्तंभलेखक, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्रोफेसर एमेरिटस
‘विक्रम संपत यांचे सावरकर चरित्र लेखन हे एक मोठे यश आहे. विस्तृत संशोधनाचा पाया असलेले; पण वाचायलाही अगदी सोपे असलेले हे पुस्तक आधुनिक भारताला आकार देण्यासाठी झटलेल्या या हिंदू क्रांतिकारकाचे कल्पनाविश्च जिवंत करते.’
– फ्रान्सिस रॉबिन्सन, दक्षिण आशियाच्या इतिहासाचे प्राध्यापक, रॉयल होलोवे, लंडन बिद्यापीठ
‘भारतीय लेखकाने लिहिलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चरित्राचा हा समर्पक उत्तरार्ध आहे. विक्रम यांनी लिहिलेल्या या भागातील काळ्या पाण्यानंतरची सावरकरांची गुंतागुंतीची कहाणी, हिंदूमध्ये आधुनिक राजकीय चेतना निर्माण करण्यातील त्याची भूमिका २१व्या शतकातील
भारतात सुरू असलेल्या बादविवादांना पार्श्वभूमी प्रदान करतात.’
– संजीव सान्याल, लेखक आणि अर्थतज्ज्ञ
‘समस्या सामाजिक असो की सांस्कृतिक, सावरकरांचे ठसे सर्वव्यापी आहेत. एक राजकीय कार्यकर्ते, बिचारवंत आणि वक्ता असे सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंचे तपशील नोंदवल्याबद्दल मी विक्रम यांचे अभिनंदन करतो… मला आशा आहे की, हे लेखन भारतीयांना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बिस्मृतीत गेलेल्या नायकाची ओळख करून देण्यात अतिशय यशस्वी ठरेल.’
– राम माधव, भाजपचे भूतपूर्व राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य, राष्ट्रीय स्वयसेवक सघ
‘संपत यांच्या उत्तम पुस्तकाला माझे समर्थन हे भारतीय राजकीय इतिहासाचा विद्यार्थी म्हणून आहे; महात्मा गांधी ज्यासाठी जगले आणि शेवटी मारले गेले, त्यांच्या अगदी बिरुद्ध असलेले सावरकर हे टोकाचे विभाजनबादी व्यक्तिमत्त्व होते, असे मानणाऱ्या विद्यमान राजकीय नेत्याचे नाही.’
- – जयराम रमेश, भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि लेखक
Reviews
There are no reviews yet.