छत्रपती शिवाजी महाराज संच
₹900.00 Original price was: ₹900.00.₹799.00Current price is: ₹799.00.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रत्येक घरात असलीच पाहिजेत अशी पुस्तकं…
📕 छत्रपती शिवाजी महाराज
✒️ कृष्णाराव अर्जुन केळुस्कर
मराठीतील आद्य शिवचरित्रकार म्हणून ओळखले जाणारे कृष्णाराव अर्जुन केळुस्कर यांनी
इ.स.१९०३ साली छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली.
हे चरित्र लिहिण्याचे काम सुरु असतांना स्वतः शाहू महाराज यांनी मदत केली.
तत्कालीन उपलब्ध असलेली अनेक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार यांचा अभ्यास करून त्यांनी १९०७ साली हे लिखाण पूर्ण केले.
प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेच पाहिजे.
पृष्ठसंख्या: ५२८
मूळ किंमत: ४५०
📕 छत्रपती शिवाजी महाराज – काळ आणि कर्तृत्व
✒️ जदुनाथ सरकार
छत्रपती शिवाजी राजांचे इंग्रजांशी आणि पोर्तुगीजांशी कसे संबंध होते?
सतराव्या शतकातील दख्खनच्या इतिहासाच्या गुंतागुंतीचे जाळे कशाप्रकारचे होते?
अशा बऱ्याच प्रश्नांची उकल या पुस्तकातून मिळेल. जदुनाथ सरकार यांच्या ‘शिवाजी अँड हिज टाइम्स’ या इंग्रजी पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचा हा पहिलाच मराठी अनुवाद आहे. शिवाजीराजांच्या मुघलांशी असलेल्या संबंधांच्या उत्कंठावर्धक वर्णनाबरोबरच मुघल सल्तनतीच्या पाडावाच्या काळातील अंतर्गत गोष्टींची तपशीलवार माहितीही या पुस्तकातून समजते.
पृष्ठसंख्या: ४७१
मूळ किंमत: ४५०
आपल्या महान राजाचं महान कर्तृत्व ठळकपणे सांगणारी , प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरांत असायलाच हवीत अशी ही पुस्तकं, आत्ताच मागवून घ्या.
Reviews
There are no reviews yet.