आयुष्य समृद्ध करणारे १०१ धडे- ब्रायना विस्ट
Original price was: ₹400.00.₹360.00Current price is: ₹360.00.
बरेचदा आधी होऊन गेलेल्या घटनांबद्दल आपण अतिशय अस्वस्थ असतो. त्यावर मग नवनवीन विचार मनात येत राहतात. आपल्याला नव्याने गोष्टी कळायला लागल्या, की त्यातून अनेक शक्यता निर्माण होतात. या शक्यता केवळ आपल्याला परिस्थितीमुळे काही नवीन धडे शिकायला भाग पडल्यामुळेच निर्माण होतात. आपल्या पूर्वजांनी शेती, समाजव्यवस्था, औषधं, अशा अनेक गोष्टी विकसित का केल्या असतील? केवळ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. एके काळी आपल्या जगात फक्त भीतीवर मात करण्यासाठी शोधलेल्या वस्तू अंतर्भूत होत्या.
व्यावहारिक संदर्भात सांगायचं, तर कुठलीही ‘समस्या’ ही तुमची समज वाढवणारी, समृद्ध करणारी असते हा विचार मनात जोपासून आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे घडवलंत, तर तुम्ही त्रासाच्या, दुःखाच्या चक्रव्यूहाला भेदून आयुष्यात भरभराट करायला शिकाल.
मला वाटतं, विचार करायला शिकणं ही ‘माणूस’ म्हणून प्रवास सुरू करण्याच्या मुळाशी असलेली गोष्ट आहे. त्यातूनच मग आपण प्रेम करणं, सुखदुःख वाटून घेणं, आपल्याजवळच्या गोष्टी इतरांना देण्याची सह-अनुभूती असणं, ‘समूह’ म्हणून एकत्र राहणं, सहन करणं, निर्मिती करणं आणि अशा कित्येक गोष्टी शिकतो. मला वाटतं, आपण कोणत्या क्षमता घेऊन जन्माला आलो आहोत, हे समजून घेणं आपलं सर्वांत महत्त्वाचं कर्तव्य आहे. ते जसं स्वतःसाठी महत्त्वाचं आहे, तसंच ते जगासाठीही महत्त्वाचं आहे.
मी जे काही लिहितं, त्या सर्व लिखाणाचं सार एका वाक्यात सांगायचं तर “या विचाराने माझं आयुष्य बदललं.” तुमच्या मनात निर्माण झालेला विचार, एखादी कल्पना तुमचं आयुष्य बदलवू शकते आणि या पहिल्या विचाराने माझं आयुष्य बदललं.
Reviews
There are no reviews yet.