नेहरू व बोस & नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष
₹750.00 Original price was: ₹750.00.₹640.00Current price is: ₹640.00.
नेताजींचे संपूर्ण व्यक्तित्व आणि जीवनेतिहास समजून घेण्यासाठी नक्की वाचा.
नेताजींवरील २ महत्वाच्या पुस्तकांचा संच तोदेखील सवलतीत कोणत्याही कुरियर चार्जेसशिवाय.
१) नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवन राजकारण आणि संघर्ष
लेखिका: कृष्णा बोस
किंमत: ४००
नेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील नामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या लेखणीतून उतरलेला सुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.
बोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या कालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या ग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या जोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं. नेताजींचं आयुष्य उलगडण्यासाठी कृष्णा । बोस यांनी संबंध उपखंडात आणि जगभर प्रवास केला. आपल्या संशोधनातून गवसलेल्या गोष्टी त्या एकत्र जोडत जातात, तशी सुभाषचंद्र बोस यांच्या राजकीय प्रेरणा, त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध, आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी हाती घेतलेले ऐतिहासिक प्रवास व धाडसी लष्करी मोहिमा यांविषयी आपल्याला
विलक्षण नवी अंतर्दृष्टी प्राप्त होते. आझाद हिंद सेनेने जिथे झुंजार लढत दिली ती मणिपूरची युद्धभूमी, नेताजींनी जिथे तिरंगा फडकावला ते अंदमान; आझाद हिंद सेनेने जिथे आकार घेतला ते सिंगापूर; व्हिएन्ना आणि प्राग ही नेताजींची युरोपातली आवडती शहरं; आणि जिथे त्यांच्या जीवनाचा दुर्दैवी अंत झाला, ते तैपेई या सर्व ठिकाणांना आपण भेट देतो.
२) नेहरू व बोस
लेखक: रुद्रांग्शू मुखर्जी
किंमत: ३५०
‘जवाहरलाल नेहरूंएवढी हानी मला कोणीच पोचवलेली नाही’,
असं सुभाषचंद्र बोस यांनी १९३९मध्ये लिहिलं होतं. नेहरूंकडे बोस यांनी शत्रू म्हणून पाहावं एवढे या दोन राष्ट्रवादी नेत्यांमधले संबंध बिघडले होते का? पण मग सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील एका पलटणीचं नाव जवाहरलाल यांच्यावरून का ठेवलं?
स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या
जडणघडणीचा शोध रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या पुस्तकात सखोलतेने घेतला आहे. भिन्न राजकीय विचारधारांमुळे नेहरू व बोस यांच्यात न उमलू शकलेल्या मैत्रीचा अदमास हे पुस्तक बांधतं आणि त्याचसोबत या दोन व्यक्तिमत्त्वांमधील भेदही अधोरेखित करतं.
एकूण ७५० रु किंमतीची दोन्ही पुस्तकं विशेष सवलतीत ६४० रु मध्ये घरपोच (कोणत्याही अतिरिक्त कुरियर चार्जेस शिवाय)
Reviews
There are no reviews yet.