द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग – हॉवर्ड मार्क्स, पूनम छत्रे
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
“द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग हे एक सर्वोत्कृष्ट पुस्तक होणार आहे. प्रत्येक विचारी गुंतवणूकदाराच्या पुस्तकांच्या कपाटात हे पुस्तक स्थान पटकावणार आहे. अनेक वर्षांच्या गुंतवणुकीच्या शहाणपणाचा अर्क हॉवर्ड मार्क्स यांनी या पुस्तकात उतरवलेला आहे आणि हे छोटेखानी पुस्तक स्पष्ट, मनोरंजनात्मक आणि सखोल विचारदर्शन करणारे आहे.”
जोएल ग्रीनब्लॅट
कोलंबिया बिझनेस स्कूल, गॉथम कॅपिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार
“कित्येक वर्षं मूल्याधारित गुंतवणुकीबद्दल प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतर, त्याच्या गाभ्याबद्दल प्रगाढ चिंतन करून एखाद्या असामान्य कौशल्य असणाऱ्याने त्याचे लिखित विश्लेषण केले, की हे असे पुस्तक तयार होते – मूल्याधारित गुंतवणूकदारांसाठीनां विशेष उपयुक्त ठरेल असे पुस्तक.”
जेरेमी ग्रॅन्थम
ग्रॅन्थम मेयो व्हान ऑटरलूचे सह-संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक धोरणकर्ते
“त्यात समाविष्ट असलेली अत्यावश्यक सत्यकथने आणि सुरेख दृष्टिकोन यांसाठी हॉवर्ड मार्क्स यांच्याकडून नियमितपणे येणाऱ्या गुंतवणुकीसंबंधी मेमोंची आवर्जून बाट पाहिली जाते. आता या महान गुंतवणूकदाराचे ज्ञानभांडार आणि अनुभव सर्वांसाठी उपलब्ध आहे. मार्क्स यांचे गुंतवणुकीसंबंधीचे तत्त्वज्ज्ञान आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला दृष्टीकोन, द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंगमधून वाचकांच्या भेटीला आलेला आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने वाचायलाच हवे, असे हे पुस्तक आहे.”
– सेथ ए. क्लार्मन अध्यक्ष, द बाऊपोस्ट ग्रुप
Reviews
There are no reviews yet.